छत्रपती कॉलेज–भारत पेट्रोलियम परिसर अपघातप्रवण; नगरपरिषद व महामार्ग विभागाने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 15 जून 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
श्रीगोंदा शहरातील छत्रपती कॉलेज ते भारत पेट्रोलियम पेट्रोल पंप दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील परिसर अपघातप्रवण ठरत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी श्रीगोंदा नगरपरिषद, संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभाग, वाहतूक पोलीस व प्रशासनाकडे या परिसराची संयुक्त पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहनचालकांना सतर्क करणारे सूचना फलक, वेगमर्यादा दर्शक चिन्हे, रंबल स्ट्रिप्स, फ्लॅशिंग सिग्नल तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीगोंदा नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
🟠🔵🔴🟡
