सहायक निबंधक सहकारी संस्था यांना ठेवीदारांचा घेराव
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १८ मार्च २०२६
प्रतिनिधी-शिवाजी खोमणे
श्रीगोंदा:साई सेवा पतसंस्था गैर व्यवहार प्रकरण चांगलेच तापलेल पहायला मिळाले,यामुळे तालुक्यातील ठेवीदाराची ठेवी ठेवलेल्या शाखेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुय्यम निबंधक श्री परजणे साहेब साई सेवा संस्थेत आले असता मोठ्या प्रमाणात ठेवीदार शाखेच्या आवारात जमा झाले होते.
यावेळी ठेवीदारांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले यावेळी ठेवीदारांनी एकच सुर काढला की ‘ तुम्हाला संचालकानी किती पैसे दिले ‘‘ संस्थेत गैर व्यवहार झाला हे उघड झाले असतानाही आपण गप्प का असे अनेक प्रश्न केले .यावेळी दुय्यम निबंधक हेच या लोकाना पाठीशी घालत आहे असे मत तालुक्यातील जनतेचे झाले आहे. यावेळी चेअरमन सह संचालकही उपस्थित होते
यावेळी प्रीतम पाचपुते, आशा ताटे, सारंग पाचपुते, प्रशांत पाचपुते यांच्या सह अनेक ठेवीदार उपस्थित होते.
🟣🔴🟢🟠
