उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रा. सुरेश म्हेत्रे यांना प्रदान
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ९ फेब्रुवारी २०२६
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश म्हेत्रे यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण प्रतिनिधी ते उपसंपादक अशी विविध पदे भूषवित त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. सध्या ते दैनिक समताभूमी न्यूज नेटवर्क मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असून यापूर्वी दैनिक एकनिष्ठा व दैनिक शब्दभूमी या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी सेवा दिली आहे. त्याचबरोबर राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पोलिस निरीक्षक श्री. उमेश परदेशी, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे १३ वे वंशज ह.भ.प. श्रीनाथ महाराज गोसावी, व्याख्याते व साहित्यिक सुभाष सोनावणे, अण्णा पारधे (होमगार्ड जिल्हा प्रशासक अधिकारी), अन्सार शेख (राष्ट्रीय अध्यक्ष), शकील मणियार (राज्य अध्यक्ष), बाळासाहेब कोटुळे (राज्य सचिव), भैय्यासाहेब बॉक्सर (अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष) आणि शरद कासार (अहिल्यानगर तालुका अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
🔴🟢🟠🟣
