श्रीगोंदा नगरपरिषद प्रभाग रचनेला हरताळ ,मतदार यादीत फेरफार
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग रचना जाहीर झाली.मात्र काही इच्छुक उमेदवारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या सोयीच्या मतदारांची नावे आपल्या प्रभागात सामाविष्ट करण्यात यावीत अशा प्रकारच्या हरकती घेतलेल्या आहेत. तरी त्या हरकतीचा निवडणूक अधिकारी यांनी नियोजित प्रभाग नकाशानुसार स्वतः पाहणी करून घेवून ज्या प्रभागात राहत आहेत त्यांची नावे त्याच प्रभागात ठेवण्यात यावीत.
असे पत्र निवडणूक अधिकारी यांना मतदारांनी दिलेले आहे. अशा प्रकारे प्रभाग 1,5,6,8,9 मध्ये इतर ठिकाणच्या मतदारांची नावे सामाविष्ट करण्यात आलेली आहेत. निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून जो अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून सोयीच्या प्रभागात नावे सामविष्ट करणे म्हणजे गुन्हा आहे. श्रीगोदा नगरपरिषदेत असे प्रकार घडत आहेत. मतदार यादीत फेरफार असे प्रकार करणे म्हणजे प्रभाग रचनेला हरताळ फसल्याचा प्रकार आहे .
चौकट
श्रीगोदा शहराच्या पूर्वेकडील काही गावातील नागरिकांचे नावे श्रीगोंदा नगरपरिषदेत सामाविष्ट करण्यात आलेली आहेत ते नागरिक ग्रामपंचायत व नगरपरिषदेत दोन ठिकाणी मतदान कसे करू शकतात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी होईल.
