अहिल्यानगर जिल्ह्यात प्लास्टिक आवरणयुक्त कागदी चहा कपांवर बंदीची मागणी तीव्र
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १७ फेब्रुवारी २०२६
अहिल्यानगर जिल्हा : जिल्ह्यात प्लास्टिक आवरणयुक्त कागदी चहा कपांच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत विविध सामाजिक संघटनांकडून तात्काळ बंदीची मागणी करण्यात येत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अधिक तीव्र झाली आहे.
जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, पारनेर या तालुक्यांमध्ये चहाच्या टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वापरून फेकून देण्याजोगे कागदी व प्लास्टिक कप वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित कपांच्या निर्मितीत बीपीए (BPA) सारख्या रसायनांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गरम चहा कपात ओतल्यानंतर आतील प्लास्टिक आवरणातील सूक्ष्म प्लास्टिक कण वितळून पेयामध्ये मिसळू शकतात व ते पोटात गेल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
रसायनांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गरम चहा कपात ओतल्यानंतर आतील प्लास्टिक आवरणातील सूक्ष्म प्लास्टिक कण वितळून पेयामध्ये मिसळू शकतात व ते पोटात गेल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
पर्यावरणीय दृष्टीनेही या कपांमुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढत असून सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत अशा कपांच्या वापरावर बंदी घालावी, संबंधित विक्रेत्यांना नोटिसा बजावाव्यात व पर्यायी पर्यावरणपूरक साधनांचा वापर बंधनकारक करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेत तपासणी मोहीम राबविण्यात येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
🔴🟢🟠🟣
