अनुसूचित वंचित समाजाला कोणतीही पुरेशी योजना मिळाली नसून आंदोलन घडू: शासनापुढे ठिय्या आंदोलन होणार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळावर ५ मे २०२६
महाराष्ट्र:नांदेड, बीड,अहमदनगर ,नाशिक, आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही आदिवासी वंचित जमाती यांना शासकीय योजना पूर्ण राबविल्या गेल्या नाहीत तसेच त्यांना निवारा मिळूं शकला नाही आहे. शासनाने याबाबत केलेली घोषणा पोकळ ठरत आहे.
गेले अनेक वर्षे सरकार आल्यानंतरही शासन योजना पूर्ण नसल्याबाबत आदिवासी आणि वस्ती करुन राहणारे अनुसूचित जमातींनी ओरड करत अनेक वेळा शासन दरबारी हाका मारूनसुद्धा अधिकारी वर्ग वळून पाहत नाहीत. आम्ही आदिवासी भटकंती किती दिवस करावी याची शासनाने माहिती आम्हाला द्यावी. अनेक वर्षापासून प्रसार माध्यमांत सांगितले जाते. तसेच वेगवेगळे आदिवासी भटकंती समाजाचे छायाचित्र दाखविले जात असते.
हे केवळ आकाशातील ढगाप्रमाणेच होय का केविलवानी प्रश्न करत शासनाचा आम्ही विरोध करत आहोत. दिलेल्या सुख सुविधा आमच्या पर्यंत पोहच नसतील तर त्या योजना कागदावरती असून त्याचा काय फायदा सांगावे. अनुसूचित आणि भटकंती याच बरोबर मुलांचे शिक्षण पुरेसे होत.
नसल्याने हा समाज मागासलेला आहे.तुम्ही आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार आहात ते सांगावे. शहरी भागात होणारी लूट हि दिवसेंदिवस वाढत असून या समाजाला आणि मुलांना शिक्षण घेणे अतिशय कठीण झालेले आहे. उच्च शिक्षित होण्यापासून रोखले जाणारे सरकार आणि राजकीय नेते नकोत. मानव धर्म हा सर्वांसाठी असून मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवसाय निवडले आहेत.
मग तो गुन्हेगारी असो किंवा अणलीगली धंदे असोत. परंतु सरकार कायद्यात व्यवसाय चालवते. मग आम्हाला शिक्षण नोकरी मिळाली नाही तर असे धंदे पुन्हा उदयास आणू जाहीर आव्हाना केले आहे.
🟣🔴🟢🟠
